अरे बापरे…जिल्ह्यात आज ५९५ पॉझिटीव्ह रूग्ण; जळगावात कोरोनाचा स्फोट

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ५९५ नवीन कोरोना बाधीत आढळून आले असून यात जळगावातील सर्वाधीक रूग्ण आहेत. तर आजच ४०३ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये ५९५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १४४ रूग्ण हे जळगाव शहरातील असून अमळनेर-७८, एरंडोल-६५, पारोळा-५३ असे आहे. त्या खालोखाल जळगाव ग्रामीण- २१, भुसावळ-०७, पाचोरा-२७, भडगाव-६, धरणगाव-४०, यावल-६, जामनेर -३५, रावेर -७, चाळीसगाव-३०, मुक्ताईनगर-४१, बोदवड-२ आणि इतर जिल्हे ९ असे एकुण ५९५ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ४२४४, जळगाव ग्रामीण-८५६, भुसावळ-१११४, अमळनेर-१३२२, चोपडा-१२५५, पाचोरा-६८२, भडगाव-७१४, धरणगाव-८३९, यावल-५९४, एरंडोल-९२५, जामनेर-१२३२, रावेर-८३८, पारोळा-७३३, चाळीसगाव-८७९, मुक्ताईनगर-५४२, बोदवड-२७२, इतर जिल्हे-९० असे एकुण १७ हजार १३१ रूग्णांची संख्या झाली आहे.

आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही १७ हजार १३१ इतकी झाली आहे. यातील ११ हजार ७२८ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच ४०३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ६४७ रूग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ७५६ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news update

Protected Content