कोविड रुग्णालयातील समस्येच्या मूळापर्यत पोहोचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे ‘जळगाव फर्स्ट’तर्फे अभिनंदन

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना संसर्ग वाढल्याने चिंता व्यक्त केली जात असतांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काल रात्री कोविड सेंटरला भेट देऊन तेथील सोयीसुविधा व अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या अचानक दिलेल्या भेटीचे ‘जळगाव फर्स्ट’चे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

अधिकाऱ्यांनी कोविड सेंटरला भेट दिल्याने दाखल रुग्णांचे मनोबल वाढते. कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या अडचणी कळतात. रुग्णांच्या तक्रारी कळतात व खरी खरी माहिती मिळत असते, यामुळे जनतेचे मनोबल व आरोग्य सेवेवरील विश्वास वाढण्यास नक्की मदत मिळेल असा विश्वास जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे कौतुकही केले आहे. कार्यलयीन वेळेत प्रत्येक कर्मचारी सज्ज असतो. मात्र,कार्यालयीन वेळेनंतर वास्तवतेचे दर्शन होत असते असे डॉ. चौधरी यांनी पुढे सांगितले. अधिकाऱ्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी रात्री-अपरात्री अशी भेट देणे आवश्यक आहे. यातून कर्मचारी, रुग्ण यांना कोणत्या अडचणी येत आहेत हे समजते. पूर्वी कोविड रुग्णालयाबाबत जनतेमध्ये खराब मत होते. जिल्हा रुग्णालय म्हणजे ‘मौत का कुआ’ म्हणून प्रसिद्ध झाले होते. तेथे जाणे म्हणजे मरण पत्करणे ही धारणा लोकांची झाली होती. ही धारणा खोडून टाकण्यात नूतन जिल्हाधिकारी यशस्वी ठरतील असा विश्वास डॉ चौधरी यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांना कोठे मेक आहे हे चांगल्या पद्धतीने कळले असल्याचे मत डॉ. चौधरी यांनी व्यक्त करत जिल्हाधिकारी राऊत यांचे अभिनंदन केले आहे

Protected Content