दहा लाखासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । बांधकाम व्यवसाय करण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या टाकळी प्रचा ता. चाळीसगाव येथील पतीसह पाच जणांवर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मोनालीका विजय बोरसे (वय-२०) रा. भोकर ता.जि.जळगाव यांचा विवाह गेल्यावर्षी विजय पांडूरंग बोरसे रा. टाकळी प्रचा ता.चाळीसगाव यांच्याशी झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर लहान सहान कारणावरून विवाहितेला टोमणे मारणे सुरू झाले. त्यानंतर पती विजय बोरसे याने घरातील मंडळींच्या सांगण्यावरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करून दमदाटी करत बांधकाम व्यावसायाकरीता माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी मारहाण सुरू केले.. दरम्यान विवाहितेच्या माहेरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पैश्यांची पुर्तता करू शकले नाही. यात सासरे पांडुरंग राजाराम बोरसे, सासु आशाबाई पांडुरंग बोरसे, दिर वेदांत पांडूरंग बोरसे, रा. टाकळी ता. चाळीसगाव आणि मामसासरे सुनिल अभिमन पाटील रा. नाशिक यांनी त्रास दिला. त्यामुळे विवाहिता या छळाला कंटाळून माहेरी निघून आल्यात. विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश पाटील करीत आहे.

Protected Content