कृषि संजीवनी अंतर्गत प्रकल्प उभारणी पश्चात अनुदान वितरण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत प्रकल्प उभारणी पश्चात अनुदान वितरण होणार असून अधिक माहितीसाठी नजीकचे कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, जळगांव यांनी केले आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत, जळगांव जिल्हयातील समाविष्ट 460 गावांमध्ये 6 वर्ष कालावधी (सन 2018-19 से 2023-24 पर्यंत) कार्यान्वित आहे. प्रकल्पांतर्गत कृषि व्यवसाय प्रकल्प उभारणी करणेसाठी जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपनी, संघ व प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावातील नोंदणीकृत शेतकरी गट प्रस्ताव सादर करु शकतात.

या प्रकल्पांतर्गत आजपर्यंत जिल्हयातील एकूण 2-शेतकरी उत्पादक कंपनी व 28-शेतकरी गट यांनी सादर केलेल्या प्रकल्प मुल्य एकूण रक्कम रु.6,03,44,000/- च्या 60% प्रमाणे एकूण रक्कम रु.3,03,96,000/- इतके अनुदान वितरीत करून प्रकल्प कार्यरत झाले आहेत. यामध्ये

1) स्वच्छता व प्रतवारी, धान्यप्रक्रिया, बांधकाम व सौर उर्जा केंद्र उभारणी, 1-गोदाम बांधकाम, 2) हळद प्रक्रिया उद्योग 24-भाडे तत्वावर कृषी अवजारे केंद्र इत्यादींचा समावेश आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट (शेतकरी गटाचे गांव पोक्रा प्रकल्पात समाविष्ट असावे) यांनी गोदाम बांधकाम, औजारे बैंक, रायपनिंग चेंबर, कोल्ड स्टोरेज, पशुखाद्य युनिट (मुरघास युनिट), शेतमाल प्रक्रिया युनिट प्रकल्प उभारणीकरीता प्रकल्प मुल्यांच्या 60% पर्यंत अनुदानावर देय आहे. तसेच आपणास इच्छुक प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर अर्ज सादर करावा. त्याचबरोबर अधिक माहिती व अनुभव जाणून घेण्याकरीता प्रकल्पाने लाभान्वीत केलेल्या पुढील शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिकच्या माहितीकरीता नजीकच्या तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content