जळगाव प्रतिनिधी । येथील विसनजी नगर बँक ऑफ बंदोडाच्या मुख्य शाखेच्या वरच्या मजल्यावरच्या बँक ऑफ बडोदा क्षेत्रीय कार्यालयात 4 कोविड पेशंट सापडल्याने बँक कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. बँक कर्मचाऱयांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे
या घडामोडींच्या चर्र्चेनंतर बँक प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालय बंद ठेवले पण खालच्या मजल्यावरील शाखा कार्यालय मात्र सुरू ठेवले आहे.दोन्ही कार्यालयाचे टॉयलेट ,बाथरूम एकच असल्याने कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. बँकेत कोरोना पेशंट सापडल्याच्या वृत्ताला बँक व्यवस्थापक पवार यांनी दुजोरा दिला पण बँक कार्यालय बंद करणे आपल्या हातात नाही असे सांगितले. तपशीलवार माहितीसाठी क्षेत्रीय व्यवस्थापक मिश्रा यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. बँकेने कर्मचारी व ग्राहक हित लक्षात घेऊन बँक सॅनिटायझ करून दोन दिवस बंद ठेवावी अशी अपेक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.