जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारुच्या नशेत असलेल्या दुचाकीस्वारांनी तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्या दोघांनी भरत भगवतीप्रसाद ओझा (वय ३२, रा. विजयनगर, कानळदारोड) या तरुणाला बेदम मारहाण केली. यावेळी महिला पोलिस त्याठिकाणी पोहचले असता, त्यांना देखील त्या तरुणांनी अरेरावी केल्याने त्यांची नागरिकांनी धुलाई केली. ही घटना २६ रोजी सकाळी दहा वाजता कानळदा रोडवर घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कानळदा रोडवरील विजय नगरात भरत भगवतीप्रसाद ओझा हा तरुण वास्तव्यास असून त्याचे किराणा दुकान आहे. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुचाकीने दाणाबाजारात जात होते. त्यावेळी धनाजी काळे नरकडून कानळदा रोडवर दोन दुचाकीस्वार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत त्यांनी ओझा यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यानंतर धडक देणाऱ्या दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी भरत ओझा याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तरुणाने पोलीस ठाण्यात चला काय असेल तक्रार करा मारु नका असे सांगत असतांना देखील त्यांच्याकडून तरुणाला मारहाण केली जात होती.
दोन महिला पोलिस कर्मचारी आल्यानंतर त्यांनी ओझा यांना त्या तरुणांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना देखील त्या नशेत असलेल्यांनी अरेरावी केली जात असल्याने परिसरातील नागरिकांनी त्या दोघांची चांगलीच धुलाई केली. यावेळी तन्वीर उर्फ तन्या शेख रहीम शेख रा. गेंदालाल मिल याला पोलिसांनी ताब्यात घेत पोलिीस ठाण्यात आले. त्याच्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.