यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळन्हावी गावाच्या फाटयावर उसनवारीच्या पैसांवरून झालेल्या वादातून १५ ते २० जणांनी एकावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव तायडे (वय-३३) रा. कोळन्हावी ता. यावल यांनी संशयित आरोपी आरोपी शामराव धोंडु सोनवणे याला कोळन्हावी फाटयावर १८ मे रोजी १० वाजेच्या सुमारास दिलेले उसनवारीचे ३० हजार रुपये मागीतल्याचा राग आल्याने श्यामराव सोनवणे याच्यासह सोबत असलेले सागर उर्फ बंटी शामराव सोनवणे, हर्षल उर्फ मोंटी शामराव सोनवणे, प्रकाश छगन सोनवणे, भुषण प्रकाश सोनवणे, पंढरी रामचंद्र कोळी, दिपक कोळी, प्रमोद कोळी उर्फ पि.के. आणि रूशिकेश पाटील व त्यांच्या सोबत जळगाव येथील राहणारे अनओळखी तरूणांनी मिळून कोळन्हावी गावाच्या फाटयावर अंधारात एकत्र येवुन लाठ्या काठयांनी मारहाण केली. यातील आरोपी सागर सोनवणे सोनवणे याने लोखंडी चॉपरने डोक्यावर छातीवर व पोटावर मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नाना तायडे याच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.