जळगाव लाईव्ह टट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे नगर परिसरातून तरुणाची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी शुक्रवार २ जून रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नीरज संजय ढाके (वय-२३) रा. साळवा ता. धरणगाव ह.मु. कोल्हे नगर जळगाव आपले परिवारासह वास्तव्याला आहे. ३१ मे रात्री ११ ते एक जून सकाळी ९ वाजेच्या दरम्यान त्याची दुचाकी (एमएच १९ डिके ६४७) ही त्याने त्याच्या घरासमोर पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेले ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.