कोल्हापुरी गुळाला जीआय टॅग

 

 

कोल्हापूर:   वृत्तसंस्था । कोल्हापुरी गुळाला जीआय टॅग मिळाला आहे. कोल्हापुरी गुळ वेगवेगळ्या आकारामध्ये बनवला जातो.त्यामुळे गुळ दिसायला देखील आकर्षक असतो. कोल्हापुरी गुळाची चव देखील वेगळीचं असते

 

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल, कोल्हापूरकरांचं कुस्तीवरील प्रेम, कोल्हापुरातील तालमी याची सर्वत्र चर्चा होत असते. कोल्हापुरी चप्पल जीआय टॅग मिळाला आहे. कोल्हापूर आणखी एका गोष्टसाठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे कोल्हापुरी गुळ होय. .

 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती केली जाते. कोल्हापूर हे गुळ उत्पादनाचं मोठं केंद्र आहे. तिथे जवळपास 1250 गुळ उत्पादक युनिट आहेत. याठिकाणी कोल्हापुरी गुळाची निर्मिती केली जाते. कोल्हापुरी गुळाची जगभरात क्रेझ आहे. सध्या कोल्हापुरी गुळ यूरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये निर्यात केला जातो. वाहतुकीची सोय चांगली असल्यानं देशभर गुळ पाठवला जातो.

 

 

 

शेती, भौगोलिक , मशीन आणि मिठाई संदर्भातील उत्पदानबाबत एखाद्या क्षेत्राला, व्यक्तींच्या गटाला आणि संघटनेला जीआय टॅगिंग दिलं जाते. एखाद उत्पादन एखाद्या भागातच उत्पादित होत असेल तर त्याला जीआय टॅग दिला जातो.

 

एखाद्या उत्पादनाला किंवा पदार्थाला जीआय टॅग मिळाल्यास दुसरे कोणी त्याची नक्कल करु शकत नाही. जीआय टॅग ही उत्पानाचं भौगोलिक ठिकाण दर्शवण्यासाठी देखील वापरले जाते.भौगोलिक संकेतक (नोंदणी आणि संरक्षण) कायदा 1999 नुसार जीआय टॅग दिला जातो. जीआय टॅगिंग उद्योग संवर्धन, अंतर्गत व्यापार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

 

जीआय टॅग मिळवण्यासाठी कोणतीही निर्मिती संस्था, संघटना किंवा राज्य सरकार अर्ज करु शकते. अर्ज करण्यासाठी शुल्क देखील भरावे लागते. अर्जाची पडताळणी केल्यानंतर जी आय टॅग दिला जातो. एकदा दिलेला जी आय टॅग 10 वर्षांसाठी ग्राह्य धरला जातो. 10 वर्षांनंतर जीआय टॅगचं नुतनीकरण करावं लागते.

 

Protected Content