जिनिव्हा: वृत्तसंस्था । कोरोना प्रतिबंधक लस ही जादूची कांडी नसून संसर्ग पूर्णपणे संपणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. लस विकसित करण्यात येत असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मायकल रेयान यांनी सांगितले की, लस विकसित झाली म्हणजे आता कोरोनाचा पूर्णपणे खात्मा होईल अशातला भाग नाही. लस पुढील वर्षाच्या सुरुवातीला सर्वांनाच उपलब्ध होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. लस विकसित झाल्यामुळे आपल्या वैद्यकीय बचावात महत्त्वाचे साधन उपलब्ध झाले. मात्र, लसच संपूर्णपणे खात्मा करेल, असे मुळीच होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या ५१ लशीची मानवी चाचणी सुरू आहे. यातील १३ लस अंतिम टप्प्यात दाखल झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. ब्रिटनने फायजरने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली असून सोमवारपासून लस देण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे रशियाने शनिवारपासून लस देण्यास सुरुवात केली आहे. रशियाने सध्या ‘स्पुनिक व्ही’ ही लस देण्यास सुरुवात केली आहे. तर, आणखी दोन लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यातील एका लशीला मंजुरी दिली आहे.
, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसस यांनीदेखील कोणीही लस विकसित केली तरी कोरोना महासाथीच्या आजाराचा खात्मा करू शकत नसल्याचे म्हटले होते. जगात कोणीही लस विकसित केली तरी फक्त लशींच्या जोरावर कोरोना महासाथीच्या आजारावर मात करता येणार नाही. सध्या इतर आजारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लशींच्या प्रकारासारखीच ही लस वापरण्यात यावी. लस वापरास सुरुवात झाल्यानंतर सध्या सुरू असलेली उपचार पद्धत बदलून जाईल, असे होणार नाही, असेही त्यांनी म्हटले