कोरोना : आज ३६ रूग्ण बाधित आढळले; ४२ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ३६ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. तर ४२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही.

आजची आकडेवारी
जळगाव शहर- १८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-४, चोपडा-१, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव -०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-०, पारोळा-५, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ असे एकुण ३६ रूग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार ७८९ रूग्ण बाधित आढळले आहे. त्यापैकी ४७४ रूग्ण उपचार घेत आहे तर ५३ हजार १९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नाही. एकुण १ हजार ३०५ रूग्णाचा मृत्यू झालाय. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Protected Content