कोरोना लशीने सोन्याला ताळ्यावर आणले

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सोन्याच्या दरात सुरू असलेली घसरण बुधवारीही सुरूच राहिली असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १,८७२.१९ डॉलर्स या तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आला. भारतातही याचे पडसाद उमटले असून सोन्याचा भाव तीन टक्क्यांपेक्षा जास्त घसरून प्रति १० ग्रॅम ४९,९५५ रुपये इतका झाला.

 

 

गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारुपी विक्रीमुळे तसेच करोनावर लस मिळत असल्याच्या वृत्ताने गुंतवणूकदार निश्चिंत झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीऐवजी विक्रीकडे कल दिसून येत आहे, परिणामी सोन्याचे भाव घसरत आहेत. अमेरिकेतील गोल्ड फ्युचर्समध्येही २.४ टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति औंस १,९०० डॉलर्सवर आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे भारतातही सोन्याचे व चांदीचे भाव घसरत आहेत.

काही महिने सोन्यामध्ये असलेल्या तेजीला लगाम बसत असून सोने आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस १,८०० डॉलर्सच्या पातळीवर येऊ शकतं . अमेरिकी डॉलर्सच्या भावावर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे भाव वर खाली होत असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष डॉलरकडे लागलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारला तर सोनं महाग होतं व डॉलर घसरला तर सोनं स्वस्त होते.

गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकी रोख्यांच्या परताव्यामध्ये झालेल्या वाढीमुळे काही काळ डॉलरची मागणी वाढत होती, परिणामी सोनं महाग होत होतं., एका वर्षाचा विचार केला तर मात्र सोन्याचे भाव तब्बल २५ टक्क्यांनी वधारले आहेत. करोना महामारीमुळे वैश्विक मंदीच्या भीतीनं ग्रासलेल्या जागतिक गुंतवणूकदारांनी आसरा म्हणून सोन्याच्या खरेदीचा सपाटा लावला होता.

gold price jalgaon, gold price today jalgaon, gold rate today jalgaon, gold rate today in jalgaon, jalgaon gold market, jalgaon gold

 

Protected Content