उंटावद येथे सामुहिक प्रयत्नांनी कोरोनास ‘नो एन्ट्री’ ; शासकीय नियमांचे तंतोतंत पालन

 

यावल, प्रतिनिधी । देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक झाला होता. यावर प्रशासन व नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून नियंत्रण मिळविले आहे. कोरोना महामारीचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने मार्च महिन्यापासून नियम लागू केले होते. त्या नियमांचे तंतोतंत पालन उंटावद ग्रामपंचायनीने व नागरिकांनी केल्याने तेथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.

लॉकडाऊनच्या सुरूवातीला चोपडा तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या उंटावद ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह ग्रामसेवक गुरूदास जगंन्नाथ चौधरी यांनी सावधगीरीचा उपाय म्हणून गावात मास्क व सँनेटायझरचे वाटप केले होते. गावात वेळोवेळी धुवळणी व फवारणी देखील करण्यात आली होती. किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकिय आधीकारी डॉ. मनिषा महाजन यांनी कोरोना काळात कामानिमीत्त बाहेरगावी गेलेल्या व लॉकडाऊनमुळे गावात परतलेल्या ३५ ते ४० रूग्णांची तपासणी करून ग्रामस्थांना शासणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी वेळोवेळी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली होती. कोरोनाच्या काळात ग्रामस्थांनी बाहेरगावी लग्न समारंभ तसेच अंत्यविधीच्या कार्येक्रमास जाणेही टाळले होते. गावात अंत्यसंस्काराच्या वेळी आपसात सुरक्षीत अंतर ठेवत मास्क व सँनेटायझरचा योग्यरित्या वापर करत उंटावद ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे अत्यंत काटेकोर पालन केले. या सर्व बाबींमुळेच गावात कोरोना संसर्गाचा शिरकाव होऊ शकला नाही. परीसरातील गावात कोरोनाचे रूग्ण आढळले मात्र उंटावद या गावात येथे सुरूवाती पासून ते आजपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने दक्षता घेतल्याने एकही रूग्ण आढळला नाही. उंटावद हे लहानशे गाव आहे. नागरीक किराणा, भाजीपाला यासारख्या जिवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी बाहेरगावी जात होते. मात्र आपसात सुरक्षीत अंतर ठेवत मास्क व सँनिटायझरचा वापर करीत असल्यामुळे गावात कोरोना या विषाणुसंसर्गाचा शिरकाव झाला नाही. ग्रामस्थांच्या मनात कोरोनाची भिती होती मात्र शासनाच्या नियमांचे पालन करत उंटावद ग्रामस्थांनी सतर्कता बाळगली म्हणूनच गावात कोरोना विषाणुचीची एंन्ट्री उंटावद गावात झालीच नाही.

Protected Content