ट्रकची धडक : मोटरसायकलस्वार जागीच ठार

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील चोरवड नजिक ट्रकने एका मोटरसायकला मागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आता दहाच्या सुमारास घडली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रल्हाद रूपचंद तायडे (वय ५५ रा मुहोम्मद पूरा बुरहानपुर ) हा आपल्या मोटरसायकने बिस्किट व इतर साहित्य विक्रीसाठी रावेरकडे येत होता. चोरवड नजिक आला असतांना त्यांच्या मोटरसायकला ट्रकने मागील बाजूने धडक दिली. यात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिस पोहचले आहे.

Protected Content