धक्कादायक : वेतनाअभावी जळगावात कंडक्टरची आत्महत्या ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । थकीत वेतनामुळे एस.टी. चे कर्मचारी अडचणीत आले असतांनाच आता जळगावातील मनोज अनिल चौधरी या वाहकाने ( कंडक्टर ) याचमुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार हे या स्थितीसाठी जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.

सध्या एस.टी. महामंडळातील कर्मचार्‍यांचे वेतन थकल्यामुळे हजारो कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. या अनुषंगाने थकीत वेतनामुळे त्रस्त झालेले जळगाव आगारात कंडक्टर म्हणून काम करणारे मनोज अनिल चौधरी ( क्रमांक ४९३४३) यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

मनोज चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात म्हटले आहे की, एस.टी. महामंडळातील अपुरा पगार आणि यातील अनियमितता यांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे. यास जबाबदार एस.टी. महामंडळातील कार्यपध्दती आणि आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हे आहे. माझ्या व माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझी पी.एफ. व एलआयसी माझ्या परिवाराला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.

लॉकडाऊनमुळे एस.टी महामंडळ आर्थिक अडचणीत आले असल्याने कर्मचार्‍यांचे वेतन थकीत आहे. यातूनच ही आत्महत्या घडल्याने याची भीषणता जगासमोर आली आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांची जिल्हा रूग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

खालील व्हिडीओत पहा याबाबतचा वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/829896607785665

मृत कंडक्टरच्या कुटुंबाच्या भेटीला आमदार राजूमामा भोळे

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/411614513333076

Protected Content