यावल प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर यावल पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण राज्यात खबरदारीचा उपाय म्हणुन सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दरम्यान शंभर दिवसाच्या जवळपास येवुन ठेपलेल्या या संचारबंदीच्या काळात अनेकांचा कोरोनाबाधीत होवुन मृत्यू ओढावला आहे. या लॉकडाऊनच्या काळात यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे व त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी या संचारबंदी असतांना शहरात बेशिस्त फिरणाऱ्या सुमारे ७००हून अधिक नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत सुमारे तीन लाख ७५ हजार रूपयांचे विविध कारवाईत दंड वसुल केले. नागरिकांनी कोरोनाचे गांभिर्य लक्षात घेवून घरात रहा, सुरक्षित रहा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.