रावेर तालुक्यात पुन्हा नऊ रूग्ण कारोना बाधित; वाघोद्यात संसर्ग वाढला

रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रावेर तालुक्यात आज सकाळी पुन्हा नऊ रूग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या वृत्ताला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रावेर कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या काही स्वॅबचे अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून त्यात नऊ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये रावेर शहरातील तीन, वाघोदा ५, आणि रमजीपुर येथे १ असे आढळले आहे. ही आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. आत्तापर्यंत रावेर तालुक्यात एकुण रूग्णांची संख्या १२५ वर पोहचली आहे. यापैकी १५ मयत झाले असून ५१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहे.

Protected Content