खिरोदा-पाल, हिंगोणा येथे होर्टीकल्चर आणि टिश्यू कल्चरच्या जागेची उद्या पाहणी

फैजपूर प्रतिनिधी । येथील होर्टीकल्चर कॉलेजच्या जागेची पाहणी आणि सिमांकन करण्यासाठी आणि सोबत हिंगोणा येथील टिश्यू कल्चर पार्कच्या जागेची पाहणी करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा हे शनिवारी 24 ऑगस्ट रोजी येणार आहेत.

महाराष्ट्र कृषी आणि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या १५ दिवसात संबधित विषयाचा पाठपुरवा करून ना.हरिभाऊ जावळे यांनी या विषयाला गती देऊन अंतिम टप्यात काम आणल आहे. संबधीत विषयाचे अधिकारी यांना या विषयाची पूर्तता तात्काळ करण्याच्या सूचना त्यानी दिल्या होत्या. त्यानुसारच तात्काळ या विषयावर कार्यवाही होऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा, रिसर्च डायरेक्टर डॉ.शरद गडाख, शिक्षण डायरेक्टर डॉ.अशोक पटोदे, रजिस्टार सोपान कासार, विद्यापीठ अभियंता मिलिंद डोके हे जागेची पाहणी आणी सीमांकन करण्यासाठी म्हणून येत आहेत. त्यांच्या सोबत महसूल, वन आणि सिटी सर्वेचे अधिकारी सुद्धा हजर राहणार आहेत. ना.हरिभाऊ जावळे यांची ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. या विषयामुळे हिंगोणा, खिरोदा आणि सबंध यावल रावेर भागात आनंद निर्माण झाला आहे. ग्रामस्थामध्ये आणि तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content