कोरोना : बुलढाणा जिल्हा रूग्णालयाचे ६४ रूग्ण निरीक्षणाखाली

बुलढाणा प्रतिनिधी । बुलढाणा जिल्हा रूग्णालयाने आज नव्याने एकही रूग्ण दाखल झालेला नाही. हे दिलासादायक असून आतापर्यंत ६४ रूग्णांना घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्याला रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्य शासनाने देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली. बुलढाणा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने संशयित कोरोना संशयितांसाठी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत एकुण ६४ रूग्ण घरीच निरीक्षणाखाली दाखल आहे. २५ तारखेपर्यंत ६१ रूग्ण निरीक्षणाखाली होते. काल नवीन तीन रूग्णांना निगराणीत ठेवले आहे. त्यातील चार संशयित म्हणून बुलढाणा आयसोलेटेड कक्षात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत एकुण ६४ रूग्ण निरीक्षणाखाली असल्याची अशी माहीती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Protected Content