जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात एकुण ५० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील आठ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- ३१, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-०, अमळनेर-४, चोपडा-३, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-०, पारोळा-७, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-१, बोदवड-० असे एकुण ५० बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५६ हजार ८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार २७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४८२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दोन बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रेडीरेकनर ९६.७७ टक्के वर आला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.