कारच्या धडकेत वयोवृध्द जखमी; कार चालकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । भरधाव कारच्या धडकेत कुटुंबियांसोबत पायी चालत असलेल्या वयोवृध्द जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीसात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पद्माकर भागवत पाटील (वय-६२) रा. दिनकर नगर, आसोदा रोड जळगाव हे आपल्या पत्नीसह २० फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पायी जात होते. त्यावेळी कार क्रमांक (एमएच १९ ३६४०) ने धडक दिली. यातील पद्माकर पाटील यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्याना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर कार चालक चेतन बाळू कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content