गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी | शहरातील तांबापूरा भागातील वृध्दाने गोठ्यात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील तांबापुरा भागातील गुरांच्या गोठ्यात आज एका इसमाने गळफास घेतल्याचे आज पहाटे उघडकीस आले. मयताचे नाव अशोक कौतीक हटकर (वय६५) असून आज सकाळी त्यांचा मुलगा दुध काढण्यासाठी गोठ्यात गेला असता त्याला हा प्रकार समजला.

अशोक हटकर यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली ? याची माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content