आ. अनिल पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

अमळनेर प्रतिनिधी | बोदर्डे-वंजारी गावात आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला.

बोदर्डे व वंजारी गावासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जळगाव यांच्या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर रोड ते बोदर्डे गावापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण १.६०कि.मी अंदाजित ८०.३८ लाख रुपये, व पारोळा ते वंजारी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण १.५० कि.मी अंदाजित ८०.२५ लाख रुपये कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार अनिल पाटील यांचा सत्कार सरपंच जितेंद्र गोकुळ पाटील व उपसरपंच यांचे पती बाळासाहेब पाटील यांनी केला तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केला. दोन्ही गावांसाठी विविध विकास कामांचे निवेदन सरपंच जितेंद्र पाटील व बाळासाहेब पाटील यांनी आमदारांना दिले.जि.प.सदस्य रोहन पाटील यांनी गावाच्या आपुलकी अन् जिव्हाळ्याबाबत कौतुक करत गावाच्या विकासासाठी आमदार अनिलदादा नक्कीच भरघोस निधी देतील असे सांगून माजी पालकमंत्री डॉ.सतीशअण्णांवर मतांचा वर्षाव केल्यामुळे त्याकाळी त्यांच्यामुळे अण्णा पालकमंत्री झाल्याचे म्हटले. आ.अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात विचार मांडतांना म्हटले की येथील ग्रामस्थांच्या चेहर्‍यावरील हावभाव व माता भगिनींनी घरोघरी केलेले औक्षणाने मी भारावून गेलो. या छोट्याशा गावातील आपुलकी आणि प्रेम पाहता येथे येणं सत्कारणी लागले असून चि.स्वर्गवासी स्वामीच्या इच्छा अपेक्षा पूर्णत्वास नेण्यासाठी या गावांसाठी निधी कधीच कमी पडू देणार नाही. या रस्त्याच्या कामाव्यतिरिक्त पुढील महिन्यात दोन्ही गावांसाठी प्रत्येकी १५ -१५ लाख रुपये निधी देईल त्यातून प्राधान्य क्रमाने आपण कामे करून घ्यावीत असे सांगताना ग्रामस्थांच्या प्रेमाने फारच भावुक झाले असल्याचे म्हटले. दोन्ही गावांचे रस्ते इतके मजबूत अन चांगले तयार केले जातील की कमीत कमी दहा वर्ष तरी ग्रामस्थांनी मला म्हणायला नको की रस्त्याला खड्डे पडले ते बुजून द्या असे म्हटले.

या कार्यक्रमाला आ.अनिल पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, जि प सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील,प स माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, उद्योगपती व महाळपुरचे सरपंच सुधाकर पाटील, प्राचार्य एस व्ही पाटील, भोकरबारी सरपंच राहुल पाटील,खेडीढोक उपसरपंच बाळू पाटील, प्रदीप राजपुत,दिगंबर पाटील, दगडी सबगव्हाण सरपंच नंदलाल पाटील, ठेकेदार रमेश शिरसाठ, रत्नापिंप्रीचे उपसरपंच अंकुश भागवत, उपअभियंता श्री.ढाके, कनिष्ठ अभियंता विवेक पाटील पंतप्रधान ग्राम सडक योजना जळगाव यांचेसह बोदर्डे – वंजारी, भोकरबारी, शेवगे व परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content