Home क्राईम गटारीत कचरा टाकण्यावरून महिलेच्या पायावर टाकली फरशी

गटारीत कचरा टाकण्यावरून महिलेच्या पायावर टाकली फरशी

0
102

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरासमोरील गटारीत कचरा टाकण्याच्या कारणावरून एका महिलेच्या पायावर फरशी टाकून दुखापत केल्याची घटना १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबुराव रामाचंद्र भापकर वय ६६ रा आकोला यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी ही जळगाव शहरातील शिवाजी नगरात वास्तव्याला आहे. १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता त्यांची मुलगी व त्यांच्या घराच्या शेजारी राहणारी महिला मोना राजेश बादल यांच्या गटारीत कचरा टाकण्यावरून वाद झाला. या वादातून मोना बादल या महिलेने मुलीच्या पायावर फरशी टाकून दुखापत केली. याप्रकरणी अखेर मंगळवारी २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मोना राजेश बादल रा. शिवाजी नगर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ हे करीत आहे.


Protected Content

Play sound