शिरसोली येथील तरूणाने घेतला गळफास; एमआयडीसीत नोंद

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील हातमजूरी करणाऱ्या तरूणाने मजूराने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, सुभाष सुकलाल मराठे (वय-२५) रा. इंदीरा नगर, शिरसोली हा आपल्या आई-वडीलांसह राहतो. जळगाव शहरात बांधकाम मजूरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बहिणीचे लग्न झाल्यामुळे घरात तिघेच राहतात. आज गुरूवार २४ डिसेंबर रोजी आई व वडील घरात नसतांना सुभाष मराठे याने छताला साडीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. मयत तरूणाच्या पश्चात आई सुमनबाई, वडील सुकलाल भानूदास मराठे आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे, शुध्दोधन ढवळे करीत आहे.

Protected Content