कोरोना : जिल्ह्यात आज २४ बाधित रूग्ण आढळले; ३३ रूग्ण झाले बरे

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण २४ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर ३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जिल्ह्यातील एकुण आठ तालुक्याचा अहवाल निरंक असल्याचे दिसून आले आहे.

आजचा अहवाल 

पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुका निरंक आढळून आला आहे. तर जळगाव शहर – ८, जळगाव ग्रामीण -१, भुसावळ-४, अमळनेर-२, चोपडा-३ , धरणगाव-१, यावल-२, पारोळा-३ असे एकुण २४ बाधित रूग्ण आढळले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण ५५ हजार ६२१ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५३ हजार ८८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४१६ बाधित रूग्ण विविध ठिकाण उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Protected Content