भाजपच्या विजयातून अरविंद देशमुख यांनी जिंकली लाखाची पैंज !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यसभा निवडणुकीतील तिन्ही उमेदवारांच्या विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी भल्या पहाटेपासूनच जल्लोष सुरू केला असतांना माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचे पी.ए. अरविंद देशमुख यांना देखील हा विजय खूप वेगळ्या अर्थाने पावला आहे.

राज्यसभा निवडणुकीची सुरस वाढीस लागली असतांना सायंकाळी आमदार गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी सोशल मीडियातून एक खुले आव्हान जाहीर केले. यात त्यांनी राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असा दावा करतांना एक लाख रूपयांची पैज लावण्यास कोण तयार आहे ? असे आव्हान दिले होते. याला जळगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राहूल पाटील यांनी उत्तर देऊन पैज स्वीकारली. यानंतर अनेक तासांपर्यंत राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबल्याने अरविंद देशमुख यांची अनोखी पैंज ही चर्चेचा विषय ठरली.

दरम्यान, ही पैज लावल्यानंतर सोशल मीडियातून यावर तुफान चर्चा होत असतांना राज्यसभा निवडणुकीचा निकाल खूप लांबला. अखेर आज पहाटे याचा निकाल लागला. यात भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसतांनाही हा चमत्कार घडला. अर्थात, यामुळे अरविंद देशमुख यांनी लावलेली पैज देखील ते जिंकले आहेत. यामुळे राज्यसभेतील या विजयाचा अरविंद देशमुख यांना एक लाख रूपयांचा विजय होणार आहे. खरं, तर यातून त्यांचा कॉन्फीडन्सचा जिंकला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: