जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले नसून एक रुग्ण बरा झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७९४ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २१० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर ७ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एस. चव्हाण यांनी दिली आहे.