जळगावात ‘महात्मा को नमन’ प्रदशर्नास प्रारंभ

0

जळगाव प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधींजीच्या पुण्यतिथीनिमित्त ‘महात्मा को नमन’ चित्रप्रदर्शनाचे आज संध्याकाळी उदघाटन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, संघपती दलीचंदजी जैन, गांधी विचारांचे अभ्यासक प्रो. मार्क लिंडले, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विश्‍वस्त ज्योती जैन, अंबिका जैन उपस्थित होते. हे प्रदर्शन ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान महात्मा गांधी उद्यानात सर्वांसाठी खुले असणार आहे.

पुस्तकाचे प्रकाशन

या प्रदर्शनात महात्मा गांधीजींच्या निर्वाणानंतरच्या बाबी- अंतिमयात्रा, अंतिमसंस्कार, अस्थिकलश यात्रा, अस्थिविसर्जन व त्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींसोबतच महनीय व्यक्तिंनी वाहिलेली श्रद्धांजली इत्यादिचा समावेश यात असणार आहे. वैश्‍विक पातळीच्या अनेक बाबी बघण्याची अनमोल संधी या निमित्ताने जळगावकरांसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनने उपलब्ध केली आहे. यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या परिक्षा विभागातील भुजंगराव बोबडे यांनी लिहलेल्या महात्मा गांधी ‘ऑर्काइव्ह हिस्ट्री ऑफ १९४२’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विदेशी मान्यवर

प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रासाठी प्रो. मार्क लिंडले हे वाशिंग्टन येथून खास जळगावात उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता वासंती दिघे, गीता धरमपाल, कॅप्टन मोहन कुलकर्णी, वैशाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अश्‍विन झाला यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, डॉ. जॉन चेल्लादूराई, अशोक चौधरी, चंद्रशेखर पाटील, अनिलेश जगदाळे, निलेश पाटील, तुषार बुंदे, योगेश संदाशिव, प्रमोद जैन, डिंगबर कोळी आदींनी सहकार्य केले.

प्रदर्शनात काय पाहणार

महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करणार्‍या आणि गांधी विचारांना, कार्याला मानणार्‍या देश-विदेशातील नोबेल पारितोषिक विजेते, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तत्वज्ञ आदींनी गांधीजींच्या जीवनाबद्दल काढलेले गौरवोद्गार यांचा उल्लेख असलेले फ्लेक्स पाहता येणार आहे. महात्मा गांधीजींची अंतिम यात्रा ‘न भूतो, न भविष्यती’ अशी झाली होती. ही यात्रा किती लांब होती. महात्माजींच्या अंतीम यात्रेसाठी कोणती गाडी वापरली होती. यांसारखे अनेक उत्कंठावर्धक ऐतिहासिक दुर्मिळ क्षण ‘महात्मा को नमन’ या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे गांधीजींच्या अंतिम दर्शनाच्या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन संरक्षण विभागाने केले होते. स्वातंत्र प्राप्ती नंतर प्रथमच एव्हढी मोठी, संवेदनशील जबाबदारी संरक्षण विभागाने पेलून सक्षमतेचा संदेश दिला होता. हे प्रदर्शन उद्यानाच्या वेळात सकाळी ५ ते १० आणि संध्याकाळी ५ ते रात्री १० या जळगावकरांसाठी खुले असून याठिकाणी भेट द्यावी; असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!