कोरोना : घरांच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे रियल इस्टेटवर मोठे मंदीचे सावट निर्माण झाले आहे. कारण कोरोनामुळे घरांच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याचे मत भारतातील गृहकर्ज देणारी सर्वात मोठी संस्था एचडीएफसीचे संस्थापक दीपक पारीख यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनासारख्या माहामारीच्या काळात जिथं काम-धंदे बंद पडल्यामुळे सामान्य ग्राहकाला घर खरेदी करण्याकडे वळवण्यासाठी टीडीआर, आयक्यूआर, यूएलसीसारख्या खर्चात सूट दिली नाही तर ग्राहक घराची रक्कम आधी देऊ शकणार नाहीत. तसेच स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फीसुद्धा काही काळासाठी माफ करावी, अशी गरज दीपक पारीख यांनी बोलून दाखविली. दरम्यान, एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता घरांच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

Protected Content