अभियांत्रीकी प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ्

मुंबई प्रतिनिधी | अभियांत्रीकीसाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. एसटी संप, ओमायक्रॉनचा धोका आदींमुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठी निश्चित झालेल्या महाविद्यालयांमध्ये पोहोचता येत नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह संघटनांनी केली होती. याला प्रतिसाद देत सीईटी सेलने मुदतवाढ दिली आहे.  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना आणखी तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांनी १० डिसेंबरपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे.

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना १९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. यंदा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी १ लाख ८ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ती गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी इंजिनीअरिंग महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.

या अनुषंगाने विद्यार्थ्यांना  आता १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून आता दुसरी यादीच्या जागांची माहिती १२ डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर १३ ते १५ पसंतीक्रम भरावयाचा आहे. त्यानंतर १७ डिसेंबरला दुसरी यादी जाहीर होणार आहे.

Protected Content