कोरोनाच्या संशयावरून फ्रेंच पर्यटक तपासणीसाठी ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जनता कर्फ्यू सुरू असतांना फ्रान्सहून आलेला एक परदेशी पर्यटक सकाळी जळगावात दाखल झाला. जनता कर्फ्युमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने तो शहरातील रस्त्यांवर फिरत होता. ही बाब कळल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलिसांनी त्याला रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी हलवले.

याबाबत वृत्त असे की, फ्रान्स देशातून लुनिया नामक एक पर्यटक काही दिवसांपूर्वी भारतात आलेला आहे. रविवारी तो जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी रेल्वेने जळगावात आला. मात्र, जनता कर्फ्यूमुळे सर्वत्र बंद असल्याने त्याला हॉटेल मिळत नव्हते. शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बंद असल्याने तो शहरातील रस्त्यांवर फिरत होता. ही बाब जळगाव पोलीस दलातील शीघ्र कृती दलाचे कर्मचारी कृष्णा पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने त्याची विचारपूस करून त्याला कोर्ट चौकात थांबवले. खबरदारी म्हणून कृष्णा पाटील यांनी पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती कळवली. त्यानंतर १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलावून घेत परदेशी पर्यटकाला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी हलवले. या प्रकारामुळे काहीवेळ गोंधळ उडाला होता. झालेल्या प्रकारामुळे पर्यटक देखील गोंधळला होता.

दरम्यान, या घटनेवरून परदेशातून भारतात आलेल्या पर्यटकांना संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही उपाययोजना नसल्याचे समोर आले. त्या परदेशी पर्यटकाची जिल्हा रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content