कोरोना : देशभरात रुग्णांमध्ये वेगाने वाढ ; राज्यात ६४ तर देशात ३१५ रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत 315 रुग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात हा आकडा ६४ वर पोहचलाय.

 

भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची आतापर्यंत ३१५ रुग्ण समोर आले आहेत. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत हा आकडा २७ झाला आहे. केरळमध्ये ५२, राजस्थानमध्ये २५, महाराष्ट्रात ६४, तर पंजाब-गुजरातमध्ये १३ लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. आसाममध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. झारखंडहून आसाम पोहचलेल्या साडेचार वर्षांच्या चिमुकलीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आजच्या ‘जनता कर्फ्यू’ला देशातील उस्फुर्त प्रतिसाद दिलाय.

Protected Content