कोरोनाचा कहर : इटलीत एका दिवसांत ८०० लोकांचा मृत्यू

रोम (वृत्तसंस्था) इटलीत एका दिवसांत ८०० लोकांचा मृत्यू झाला असून इटलीतल्या आतापर्यंतच्या मृतांची संख्या ४८२५ वर गेली आहे. तर दुसरीकडे फ्रान्समध्ये ११२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा ५६२ पर्यंत पोहोचला आहे.

इटलीत एका दिवसांत ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतल्या आतापर्यंतच्या मृतांची संख्या ४८२५वर गेली आहे. इटलीतील स्थिती ही चीनपेक्षा जास्त खराब आहे. इथे कोविड-19 (COVID-19)ची लागण झालेल्यांची संख्या ५३५७८ एवढी आहे. तर मिलानजवळील नॉर्थ लोम्बर्डीमध्ये मृतांचा आकडा तीन हजारांपेक्षा जास्त झाला आहे. इटलीमध्ये होणाऱ्या एकूण मृतांच्या संख्येपैकी हे दोन तृतीयांश आहे. इटलीमध्ये शुक्रवारपासून १४२० लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे ११२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा ५६२ पर्यंत पोहोचला आहे.

Protected Content