आज जिल्ह्यात कोरोनाचे २३ रुग्ण आढळले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात २३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ७२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

तालुका निहाय आकडेवारी
जळगाव शहर-०८, भुसावळ-११, अमळनेर-०१, धरणगाव-०१, चाळीसगाव-०२ असे एकुण २३ कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ४५८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ७१६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या १७२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content