पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्यास एक वर्ष सक्तमजूरी

0court 383

जळगाव प्रतिनिधी । गुन्ह्यात संशयित म्हणून अटकेत असलेल्या आरोपीने पहारा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून आरडाओरड केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची सक्तमुजरीची शिक्षा सुनावली. चिंग्या उर्भ चेतन सुरेश आळंदे (वय-34) रा. जळगाव असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, 4 जुलै 2014 रोजी शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असलेल्या संशयित आरोपी चिंग्या उर्भ चेतन सुरेश आळंदे (वय-34) रा. जळगाव यांने पहारा देणाऱ्‍या पोलीस कर्मचारी पुरूषोत्तम सुपडू लोहार यांना रात्री 10.10 वाजता इतर लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीला भेटू द्या असे सांगितल्यावर पोलीसांनी नकार दिल्याने याचा राग येवून पुरूषोत्तम लोहार यांची कॉलर पकडून चिंग्याने शिवीगाळ केली व तुम्हाला बाहेर बघून घेईन अशी धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी लोहार यांच्या माहितीवरून शहर पोलीसात आरोपी चिंग्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानुसार हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात सुरू करण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकुण 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे व धमकी ग्राह्य धरत आरोपी चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे याला दोषी ठरवत एक वर्षाची सक्तमजूरी आणि हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.पंढरीनाथ चौधरी व सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

Protected Content