यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर युवानेते युवा सम्राट सुपर मॉलचे संचालक संदीप सोनवणे यांनी तालुक्यातील कोरपावली गावात कोरोना या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५०० मास्क मोफत उपलब्ध करून दिलेत.
यावेळी तालुक्यातील राहणार जि.प.चे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शननुसार गावातील ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर, मेडिकल चालक, डॉक्टर, किराणा दुकानदार, दूध संकलन करणारे कर्मचारी, पोलिस पाटील, लाईनमन, वायरमन, शेतकरी बांधव, शेतमजूर, गावातील अबाल वृद्ध या सगळ्या लोकांना मोफत वाटून त्यांना त्याचा वापर करण्याची विनंती करून कोरोना या संसर्गजन्य रोगापासून बचाव कसा करायचा या बद्दल माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच जलील पटेल, उपसरपंच मनीषाताई तडवी, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, तलाठी मुकेश तायडे, मुख्याध्यापक धनराज कोळी, पोलीस पाटील सलीम तडवी, इस्माईल तडवी, मुनाफ तडवी, डॉ. राजू पटेल, किशोर जावळे, ग्रापं सदस्य अमोल नेहेते, राजेंद्र पाटील, सर्फराज तडवी, ग्रापं सदस्यां पुष्पाबाई भालेराव, हिराबाई तडवी, कय्युम पटेल, हमीद पटेल, जावेद पटेल, महेबूब मेंबर, जहांगीर तडवी, रवींद्र तायडे, किसन तायडे, इकबाल मेंबर, रमजान तडवी, आदिल पटेल, हर्षल महाजन, आदी उपस्थित होते.