पीर यासीन मिया कादरी उर्स साधेपणाने साजरा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील एकोप्याचे प्रतिक मानल्या जाणार्‍या पीर यासिन मिया कादरी यांचा उर्स यंदा अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला.

नशिराबाद येथे पीर यासिन मिया कादरी यांचा ऊर्स यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने साजरा करावा लागला. दर्गावर जानी मिया कादरी यांच्या उपस्थितीत चादर चढविण्यात आली. या वेळी पोलिस स्थानकाचे सपोनि गणेश चव्हाण, माजी सरपंच पंकज महाजन, माजी ग्रा. प. सदस्य विनोद रंधे, देवेंद्र पाटील, सय्यद बरकत अली, सुरेश महाजन, गणेश चव्हाण, अझर पिंजारी आदी उपस्थित होते.

 

Protected Content