Home आरोग्य भयंकर : दहा कोरोनाबाधीत रूग्णांमुळे जिल्हा पुन्हा हादरला

भयंकर : दहा कोरोनाबाधीत रूग्णांमुळे जिल्हा पुन्हा हादरला

0
44


जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या ७८ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे जिल्ह्याची स्थिती चिंताजनक आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये भुसावळ येथील ५, चोपडा येथील २, अमळनेर येथील १ तर मेहरूण व ममुराबाद (जळगाव ) येथील २ रूग्ण असे एकूण १० रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १२४ इतकी झाली असून त्यापैकी सोळा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound