एरंडोल ग्रामीण रूग्णालयाला नगरसेवकातर्फे थर्मल स्कॅनर सुपूर्त

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल ग्रामीण रूग्णालयासाठी येथील नगरसेवक अब्दुल शकुर मोमीन यांच्यावतीने थर्मल स्कॅनर उपलब्ध करून दिला आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ. कैलास पाटील यांना सुपूर्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हे विना थर्मल स्कॅनरच्या साहाय्याने रूग्णांची तपासणी केली जात आहे. तर काही ठिकाणी फक्त लक्षणे विचारुन गोळ्या औषधी देत असल्याचे एरंडोल येथील पत्रकार रतीलाल पाटील व नगरसेवक अब्दुल शकुर मोमीन यांच्या लक्षात आले.

अब्दुल शकुर मोमीन यांनी तात्काळ जळगाव वरुन नविन अंदाजे ८ हजार ५०० रुपये किंमतीचे थर्मल स्कॅनर आणून एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास पाटील यांना सुपूर्द केले. यावेळी त्यांचे सोबत रतीलाल पाटील, मोहसीन खाटीक, आरिफ शेख मिस्तरी, हाफीज मोमीन, असलम मिस्त्री आदी उपस्थित होते.

Protected Content