केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धा संपन्न

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. यात मुलांच्या गटात बाहेती महाविद्यालयाने तर मुलींच्या गटात मू. जे.महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.

 

आंतर महाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेचे उद्घाटन केसीई सोसायटीचे पोस्ट ग्राजुएट कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे हे होते. यावेळी मंचावर खाशाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, जळगाव विभाग क्रीडा सचिव प्रा. चंद्रकांत डोंगरे, डॉ. पी. आर. चौधरी, प्रा. सतीश कोगटा, डॉ. सुभाष वानखेडे, डॉ. सचिन झोपे, डॉ. अनिता कोल्हे, प्रा.नीलिमा पाटील हे उपस्थित होते. या स्पर्धेत मुलांचे ५ संघ व मुलींचे ४ संघ सहभागी झाले होते. पंच म्हणून अक्षय येवले, आकाश सराफ यांनी काम पाहिले. स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात बाहेती महाविद्यालय प्रथम, नूतन मराठा महाविद्यालय द्वितीय व बोदवड महाविद्यालय तृतीय स्थानी राहिले तर मुलींच्या गटात मू.जे.महाविद्यालय प्रथम, केसीई आय.एम.आर. कॉलेज द्वितीय व बाहेती महाविद्यालय तृतीय स्थानी राहिले. स्पर्धा यशश्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा.निलेश जोशी, प्रा. संदीप केदार, प्रा. प्रविण कोल्हे, प्रा. अतुल गोरडे, .विजय चव्हाण तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर यांचे सहकार्य लाभले.

Protected Content