कृषी कायदे रद्द; अमळनेरात लोकसंघर्ष मोर्चाचे जल्लोषात स्वागत

अमळनेर, प्रतिनिधी | केंद्र सरकारने कृषी विरोधातील तीन कायदे रद्द केले आहे. या पाश्र्वभूमीवर अमळनेर येथे लोकसंघर्ष मोर्चा तर्फे जल्लोषात स्वागत करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना वंदन करण्यासात आले.

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विरोधातील तीन कायदे हे रद्द करावे अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाने केली होती. या अनुषंगाने २१ डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथे आमदार बच्चु कडु, राजु शेट्टी आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात एल्गार आंदोलन करण्यात आले. यात अमळनेर येथुन विभागीय संघटक पन्नालाल मावळे व नंदाबाई मावळे यांनी सपत्नीक हिरवा झेंडा दाखवुन हजारो शेतकरी कार्यकर्ते गेले होते. तसेच दिल्ली येथील आंदोलन स्थळी महाराष्ट्रातुन हजारो महिला, पुरुष, आदिवासी, शेतकरी गेले होते. २६ जानेवारी २०२१ च्या आदोलनात हि सहभागी होते. त्या दरम्यान आदिवासी महिला शेतकरी सिताबाई तडवी यांच हि बलिदान ह्या आंदोलनास आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज कृषीकायदे मागे घेतल्याची घोषणा केली. आणि शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाल्यामुळे लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे सह पदाधिकाऱ्यांनी तहसील कचेरी जवळ बळीराजाच्या स्मारकास पुष्पहार टाकून फटाक्यांची आतीशबाजी करत लोकसंघर्ष मोर्चा चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा करून ७०० शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले म्हणून त्यांना वंदन करण्यात आले. तत्पूर्वी देशभरातील शेतकऱ्यांवर लादलेले ३ अन्यायकारी व काळे कृषी कायदे केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला झुकत अखेर रद्द करावे लागले. हा देशभरातील शेतकरी बांधवांचा तसेच लोकशाहीचा मोठा विजय आहे. देशभरात गावागावात, विविध राज्यात विखुरलेल्या पण केंद्र सरकारच्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध एकजुट दाखवणाऱ्या, शेती हा धर्म माननाऱ्या शेतकऱ्यांनी एकप्रकारे सरकारला वठणीवर आणले. हा कृषीप्रधान भारताच्या कृषीशक्तीचा विजय आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्या आणि लोकसंघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी केले.

याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे,सह प्रा. अशोक पवार सर, बन्सीलाल भागवत गुरूजी, संदीप घोरपडे सर, संजय पवार, रियाजोद्दीन शेख, भारती गाला, एस.एम.पाटील, उमाकांत नाईक, बालिक पवार, कलीम फ्रुटएजंट, गणेश चव्हाण, शराफत मिस्तरी, आबिद मिस्तरी, शांताराम चव्हाण, धनराज पारधी, राजु काझी, जय पारधी, अक्तर अली, सुलतान पठाण, आकाश पारधी, जाविद मिस्तरी, मुस्तफा शेख, मुरलीधर पवार, रोशन मावळे आदी उपस्थित होते.

Protected Content