जळगाव राहूल शिरसाळे । जळगाव जिल्ह्यात कुस्ती खेळण्यासाठी परवानगी देण्यात यावी, कुस्तीगिरांना नोकरीत आरक्षण मिळावे, कुस्तीगीरांना दरमहिन्याला मानधन मिळावी यासह इतर विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी कुस्ती संघटनेतर्फे करण्यात आले असून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने कोरोनाच्या महामारीत शालेय शिक्षण पहिली ते अकरावी विद्यार्थ्यांना पास करून वरच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शालेय कुस्तीपटू, कुमार केसरी व महाराष्ट्र केसरी या सर्व गटातील कुस्तीपटू यांनी जिल्हास्तीलय कुस्ती चाचणीत विजय मल्लांना राज्यातून प्रथम मानांकन, परितोषीक व प्रमाणपत्र देण्यात यावे, जुने कुस्ती पटूंना शासनातर्फे दरमहा ५ हजार रूपये मानधन मिळावे, जुने कुस्तीपटूंना विशेष वैद्यकीय सेवा देण्यात यावी, यंदा होणाऱ्या शालेय कुस्ती स्पर्धा, कुमार केसरी व महाराष्ट्र केसरी स्पर्धा असे मल्लांच्या हिताचे व भविष्य घडविणारे कुस्ती स्पर्धा घेण्यास परवानगी द्यावी यासह अन्य मागण्या निवेदनात केल्या आहे.
जळगाव जिल्हा कुस्ती, मल्लविद्या महासंघातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष आण्ण पहेलवान कोळी, धरणगाव तालुकाध्यक्ष कोल शुक्ला, लहतीफ पहेलवान, मोतीराम पहेलवान, तालुका सचिव संजय जैन, जामनेर येथील उपाध्यक्ष शंकर राजपूत, तांत्रिक समितीचे संदीप कनखरे, पातोंडा येथील पहेलवान आबा माळी, अमोल कोळी, सुभाष गायकवाड, मनिष पहेलवान, मनोज पाटील आणि सुनिल वाकोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.