जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित विशेष दत्तकगृह, शिशुगृह, जळगाव येथील कंत्राटी पद भरतीकरीता प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी शासनाच्या Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.

जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित विशेष दत्तकगृह, शिशुगृह, जळगाव येथील कंत्राटी पद भरतीकरीता उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी शासनाच्या Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील दर्शनीय भागात देखील प्रकाशित करण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांनी या पद भरतीसाठी अर्ज केलेले आहेत व ज्यांना या अर्जांवर हरकत घ्यावयाची आहे, अशा उमेदवारांनी E-mail [email protected] अथवा प्रत्यक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव या कार्यालयात 9 डिसेंबर 2021 पर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून लेखी हरकती नोंदवाव्यात.

या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या लेखी हरकतींचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. सदरची भरती प्रक्रिया ही प्राप्त गुणांकनाच्या आधारे व पारदर्शक पध्दतीने पार पडणार आहे. त्यामुळे कुणीही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

Protected Content