कासमवाडीतून दोन बकऱ्यांची चोरी

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील कासमवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या दोन बकऱ्यांची चोरी केल्याची घटना बुधवार ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी गुरुवार ४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की. इंदुबाई रामा माळी वय-५८, रा. कासमवाडी जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बकऱ्यांचा पालन करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान संशयित सर्फराज खान शहीद खान रा. पोलीस कॉलनी जळगाव यांनी महिलेच्या मालकीच्या १० हजार रूपये किंमतीच्या दोन बकऱ्या चोरून नेल्या. दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेने दुसऱ्या दिवशी गुरुवार ४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन संशयित आरोपी सर्फराज खान यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी सर्फराज खान शहीद खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.

Protected Content