इमारतीचे बांधकामाचे साहित्य लांबविले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बिबानगर पार्क परिसरात बांधकामाच्या ठिकाणाहून ४७ हजार ५०० रुपये किमतीचे लोखंडी प्लेटा, लोखंडी पाईप आणि लोखंडी सोल्जर पट्ट्या असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी ११ मार्च रोजी पहाटे ३ वाजता समोर आली आहे. या संदर्भात दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कैलास पंडित भोळे (वय-५६) रा. नवीन पोस्टल कॉलनी जळगाव इमारतीचे बांधकाम म्हणून ते काम करत असतात. दरम्यान त्यांची भीमा नगर येथील बांधकामाची साईट सुरू आहे. याठिकाणी १० मार्च ते ११ मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेले लोखंडी प्लेटा, लोखंडी पाईप आणि लोखंडी पट्ट्या असा एकूण ४७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ११ मार्च रोजी पहाटे ३ वाजता समोर आली आहे. या संदर्भात कैलास भोळे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे करीत आहे.

Protected Content