मुंबई (वृत्तसंस्था) माझ्या वक्तव्याचा विपर्यास जाणीवपूर्वक केला गेला. भाजपाच्या १०० नेत्यांविरोधात मी बोललो होतो. तरी मी जे काही बोललो त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो, असे एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी म्हटले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
वारीस पठाण पत्रकार परिषदमध्ये सांगितले की, मी १०० कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर १५ कोटी मुस्लीम हे १०० लोकांच्या विरोधात आहेत असे बोललो होतो. ते १०० लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्यातले आहेत. काही पत्रकारही आहेत असाही आरोप वारीस पठाण यांनी केला आहे. तसेच आम्ही सर्व धर्मीयांचा आदर करतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास जाणीवपूर्वक केला गेला. भाजपाच्या १०० नेत्यांविरोधात मी बोललो होतो. मी देशविरोधी नाही असेही वारीस पठाण यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो, असेही पठाण म्हणाले.