Home क्राईम गणपती विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरीला ; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरीला ; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
43

Capture 172
 

बीड (वृत्तसंस्था) गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये मोबाईल चोरीला गेला म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरामध्ये घडली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की , काल (12 सप्टेंबर) गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये बीड शहरातील एका गणेश मंडळात आकाश वडमारे (वय 23 वर्ष, रा. बलभीम चौक) हा तरुण ढोल वाजवित होता. मिरवणुकीदरम्यान त्याच्या खिशातील दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला. या घटनेचा धक्का बसल्यामुळे रात्री नऊच्या सुमारास आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, साध्या मोबाईलसाठी आकाशने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound