अंशकालीन पदविधर कर्मचाऱ्यांच्या मागण्या निवडणुकीपुर्वी मार्गी लावा

WhatsApp Image 2019 09 13 at 7.00.13 PM

यावल, प्रतिनिधी | येथील महाराष्ट्र प्रदेश पदविधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या शाखेच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना अंशकालीन पदविधर कर्मचाऱ्यांच्या मागण्या निवडणुकीपुर्वी मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.

६ सप्टेंबर रोजी नशिक विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने यांची अध्यक्ष विजय पाटील यांनी तात्काळ भेट घेवुन नाशिक विभागातील अंशकालीन कर्मचारी यांच्या रिक्त मंजूर पदाची माहिती व पद भारतीबाबत माहिती घेतली होती.  विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीची आचार संहीता लागण्यापुर्वी कारवाई करण्याची विनती करु मागण्यांचे निवेदन सादर केले.  महसुल आयुक्त राजाराम मने यांनी विभागातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून रिक्त पदांचे अहवाल सकलित करण्याचे आदेश दिलेले आहेत. लवकरच करवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी अशकालीन कर्मचाऱ्यांच्या शिष्ट मंडळास दिले. त्याचप्रमाणे कौशल विकास विभागाचे नशिक विभागीय मुख्यालया येथे उपसंचालाक एस. डी. सैदाणे याना देखील निवेदन देण्यात आले आहे.

Protected Content