‘निर्भया’ खटला : दोषी विनय शर्माची याचिका फेटाळली

nirbhay

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मृत्यू दंडाची शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगाराला चिंता आणि निराशा येणे स्वाभाविक आहे. या खटल्यात दोषी विनयला मुभलक उपचार आणि मानसिक उपचार पुरवले जात आहेत, असे सांगत पतियाळा हाउस कोर्टाने आज (शनिवार) उच्च दर्जाचा उपचार मिळण्यासाठी दोषी विनयने केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

 

 

निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्मा याची याचिका दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने फेटाळली आहे. मानसिक तणावाखाली असल्याने आपल्याला तात्काळ उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी याचिका दोषी विनय शर्माने केली होती. परंतू फाशीच्या शिक्षेमुळे दोषींची मानसिक स्थिती बदलू शकते. दोषी तणावाखाली येणे साहजिकच आहे. तसेच दोषी विनयला आवश्यक आणि पुरेसे वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. यामुळे त्याची याचिका फेटाळण्यात येत आहे, असे कोर्टाने याचिकेवर निकाल देताना स्पष्ट केले आहे.

Protected Content